महाराष्ट्रात दसरा साजरा करण्याचा प्रचंड उत्साह असतो. प्रत्येक भागात निरनिराळ्या परंपरा असतात. जसं आपल्याकडे फुलांची तोरण बांधतात तसं आदिवासी भागात घरांवर शेणाने बनवलेल्या गोळ्यांची, रानातल्या फुलांची, पानांची सजावट केली जाते. घरोघरी गोड-धोड बनवलं जातं.